अहमदनगर: मी दरवेळी अहमदनगरमध्ये आल्यानंतर माझ्या बैठकीला अथवा चर्चेसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण देतो पण ते येतच नाही, कदाचित मी त्यांचा जूनियर आहे म्हणून ते येत नसावेत असं वक्तव्य अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी विरोधकांनी अहमदनगरमध्ये पालकमंत्री हरवले आहे, असं पोस्टर लावले होते त्या पाश्र्वभूमीवर आता पालकमंत्र्यांनी विखेंना टोला लगावला. राधाकृष्ण विखे पाटील यांना मी १४ ऑगस्टला झालेल्या बैठकीला बोलावले होते. पण ते आले नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत व मी ज्युनियर आहे, म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे वक्तव्य करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
‘जिल्ह्यात होणाऱ्या सगळ्या मीटिंगला सर्व मंत्र्यांना बोलावले जात नाही. ज्या मिटींगला त्यांना बोलावले जाते, त्याला ते येतातच,’ असे सांगत मुश्रीफ म्हणाले, ‘१४ ऑगस्टला मी जी बैठक घेतली त्याला सर्व लोकप्रतिनिधींना बोलवले होते. त्या बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी आले, पण राधाकृष्ण विखे आले नाहीत. कदाचित ते ज्येष्ठ नेते व मी ज्युनियर म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात किती वेळा दौरा केला याची माहिती दिली.
ते म्हणाले, ‘२० जानेवारीला पालकमंत्री म्हणून माझी निवड झाली. खरंतर माझी निवड सहा जानेवारीला झाली होती. पण बाळासाहेब थोरात कोल्हापूरला व मी येथे अशी पालकमंत्री म्हणून आमची निवड करण्यात आली. मात्र थोरात कोल्हापूरचा चार्ज घेत नव्हते, म्हणून मी इकडचा चार्ज घेत नव्हतो. अखेर २० तारखेला मी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर आजपर्यंत तब्बल चौदा वेळा माझी नगरला भेट झाली आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी आपण चांगल्या निधीची तरतूद केली होती. पण दुर्दैवाने करोना आला. नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नगर मला सुंदर करायचे आहे. ते माझं स्वप्न करोनाच्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर नक्की पूर्ण करू,’ असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- नागपुरात कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन
- शेतकर्यांवर अन्याय होणार नाही हा माझा प्रयत्न आहे, संसदेच्या अधिवेशनात विदर्भीय नेत्याचे असेही वचन
- ‘माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं जातं’ ; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खदखद
- कांदा निर्यात बंदी विरोधात नेवाशात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
- राज्य वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

