लातूर : महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याच्या दिशेने राज्य शासन सकारात्मक आहे. संविधान आणि गुणवत्ता हे दोन्ही सर्वोच्च असल्याने दोन्हीचे सुत्र बाळगून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.
येथील एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या चारशे बेडच्या स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, महानगरपालिकचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,एमआयटी पुणेचे कार्यकारी अध्यक्ष राहूल कराड, एमआयटी मेडीकल कॉलेजचे कार्यकारी संचालक तथा आमदार रमेश कराड, कार्यकारी संचालक डॉ.हणुमंत कराड,उपअधिष्ठता डॉ.बी.एस.नागोबा उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, राज्यात वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याच्या दिशेने राज्य शासन पाऊले उचलत असून संविधान व गुणवत्ता हे सर्वोच्च असल्याने दोन्ही सुत्र बाळगून दमदार पाऊल टाकण्यात येणार आहे. राज्यात जिल्हयात कोरोना (कोव्हिड-19) चा प्रार्दुभाव वाढतच चाललेला आहे. यास प्रत्येकाने न घाबरता दक्षता बाळगावी असे त्यांनी अवाहन केले. येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी चारशे बेडच्या स्वतंत्र कक्षासह कोरोना रुग्णांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षात 140 ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री श्री. देशमुख यांनी राज्य शासनाने वैद्यकीय प्रवेश विभागीय आरक्षणाची प्रक्रिया रद्द करुन सर्व विभागांना एकच व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. येत्या काळात लातूर शैक्षणिक केंद्र निर्माण होण्यात कसलीच अडचण येणार नाही असे सांगून लातूर जिल्हयाच्या विकासासाठी राजीकय अभिलेश न बाळगता सर्वांनी मिळून जिल्हयाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत असेही ते म्हणाले.
एमआयटी पुणे या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहूल कराड म्हणाले की, विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने हे महाविद्यालय उभे राहिले असून कोरोनाच्या या आपत्तीमध्ये शासन व प्रशासनाला पूर्ण सहकार्य देऊन कोरोना रुग्णांवर येथे दर्जेदार उपचार करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णांलयातील सर्व रुग्ण व उपचार केंद्रांना भेट देऊन देशमुख यांनी पाहणी केली. या कार्यक्रमास कोरोना कमीटीचे प्रमुख डॉ.अरुण कुमार राव, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख डॉक्टर्स ,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सरीता मंत्री यांनी तर आभार डॉ.बी.एस.नागोबा यांनी मानले.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यभरात मराठा आंदोलक अक्रमक; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात निदर्शनं
- नागपुरात कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन
- शेतकर्यांवर अन्याय होणार नाही हा माझा प्रयत्न आहे, संसदेच्या अधिवेशनात विदर्भीय नेत्याचे असेही वचन
- ‘माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं जातं’ ; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खदखद
- कांदा निर्यात बंदी विरोधात नेवाशात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

