मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण लागू केले होते. यानंतर काही याचिकाकर्त्यानी आरक्षण असंवैधानीक असल्याचं सांगत उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात उडी घेतली होती.
दरम्यान, या काळात महाविकास आघाडीचे आलेले सरकार हे मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप अनेकदा मराठा समर्थकांनी लावला होता. तर गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे.त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील घडामोडींवर आज त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह कांदा निर्यात बंदी, पोलीस महाभरतीसारख्या विषयांवर भाष्य केले. फडणवीसांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचा खुलासा देखील केला आहे.
काय म्हणाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस?
“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर शरद पवार हेच मार्ग काढतील- आशुतोष काळे
- माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींनी बाळासाहेब ठाकरे मालमत्ता कर माफी योजनेचा लाभ घ्यावा- संग्राम जगताप
- राज्यभरात मराठा आंदोलक अक्रमक; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात निदर्शनं
- नागपुरात कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन
- शेतकर्यांवर अन्याय होणार नाही हा माझा प्रयत्न आहे, संसदेच्या अधिवेशनात विदर्भीय नेत्याचे असेही वचन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

