Share

बालाघाट डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघाची दु:खद एक्झीट

Published On: 

🕒 1 min read

बीड : नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाचे कोषाध्यक्ष पिराजी सुर्वे पाटील (वय ९२) यांचे बुधवारी (ता. १६) रात्री पालवण चौकातील राहत्या घरी निमोनिया या आजाराने निधन झाले. सुर्वे पाटील हे बीड जिल्ह्यातील जुन्या पिढीतील दिग्गज राजकारणी स्वर्गीय बलवंतराव कदम, स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर, माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, माजी आमदार जगताप यांच्या सोबत बीड जिल्ह्याच राजकारण हकत असतं. विशेषत: त्यांचा बीड विधानसभा मतदारसंघात खास दबदबा होता. मात्र ते प्रत्यक्ष कोणतीही निवडणूक लढले नाहीत.

बालाघात डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघ म्हणून ते सर्वत्र परिचीत होते. त्यांना लोक पाटील आणि बप्पा नावाने ओळखत. पिराजी पाटील सुर्वे आणि स्वर्गीय जिल्हा परिषद अध्यक्ष बलवंतराव कदम या दोन मित्रांनी मिळून स्थापन केलेल्या नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाच्या शिवाजी विद्यालयाने बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाची भर टाकली. आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिवाजी विद्यालयाचे नावाचे गौरवाने घेतले जाते.

१९७२ च्या भीषण दुष्काळाचे नाव निघाले तरी अंगावर काटे येतात. अजुन ही जुणे जाणते लोक हादरून जातात. त्या भीषण दुष्काळात अनधान्याचा प्रचंड तुटवाडा होता. भाकरीच्या एका घासासाठी लोक तरसत होते. सरकार वेळेवर धान्य पुरवठा करू शकत नव्हते. अशा परिस्थीतीत पिराजी पाटील सुर्वे यांनी स्वत:च्या कणग्या (धान्य साठवण्याचे कोठार) भुकेल्या लोकांसाठी खुल्या केल्या होत्या.

स्वत:च गाव असलेल सुर्याचीवाडी गावासह, करचुंडी, लिंबागणेश, देवऱ्याचीवाडी, खंडाळा, भाळवणी, मांडवजाळी, पिंपवाडी, कदमवाडी, पोखरी, माजरसुंबा, कोल्हारवाडी, वडगाव, जाधवाडी, बागुलदरा, वरवटी, धानोरा, फुकवाडी, महाजनवाडीसह जवळपास २५ ते ३० गावातील गोर गरीब, विविध जाती, धर्माच्या लोकांना धान्य पुरवठा केला. यागावात आजही त्याच्या धान्यामुळं जगलेली अनेक लोक आहेत. ते त्या भीषण दुष्कळातील आठवणी निघाल्या की आवर्जून सुर्वे पाटलांचे नाव मोठ्या आदरानी घेतात.

१९७२ च्या भीषण दुष्काळात जगवलेले हजारो लोक त्यांच्या जाण्याने आज पोरके झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थीत राहु न शकल्याने हळहळ व्यक्त करीत आहेत. काहीनी मोबाईलवर कुटूंबीयांशी संपर्क साधुन दु:ख व्यक्त केले तर काहींनी प्रत्यक्ष कुंटुंबीयाची भेट घेतली. त्यांच्या पार्थीवावर त्यांचे जन्मगाव सुर्याचीवाडी येथे अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलांने त्यांना मुखअग्नी दिला. कोरोना संकटामुळे मोचक्याच नातेवाईकांच्या उपस्थीतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकचे अधिकारी आसाराम सुर्वे तसेच सुन, नातू, नाती, मली, पुतने, जावाई असा मोठा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!