Share

मल्ल्याला घडणार जन्माची अद्दल; कर्जाची वसुली करण्यासाठी स्टेट बॅंकेने आखला ‘हा’ मास्टर प्लान

Published On: 

नवी दिल्ली-  बँकांची फसवणूक करून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या मालमत्तेवर टाच येणार आहे. विजय मल्ल्याकडून आपल्या कर्जाच्या वसूलीसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मल्ल्याला जन्माची अद्दल घाविण्यासाठी स्टेट बॅंकेने एक मास्टर प्लान आखला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे.

यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील माल्या यांच्या वाट्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील. शेअर्सची विक्री बेंगळुरूच्या डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (DRT) च्या देखरेखीखाली होईल, ज्याने 6,203 कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी शेअर्सची विक्री करण्याचे वसुली अधिकाऱ्यास अधिकार दिले आहेत. जर ब्लॉक डील अंतर्गत शेअर्स विकले गेले नाहीत तर बँका शेअर्सची ब्लॉक किंवा रिटेलच्या माध्यमातून विक्री करू शकतात.

किंगफिशरला देण्यात आलेले कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आले होते. विजय मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पळ काढला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.या प्रकरणात, फरारी विजय मल्ल्या याने गेल्या वेळी माध्यमांना दिलेल्या निवेदनात, असा दावा केला होता की, त्याने जे कर्ज घेतले त्यापेक्षा जास्त किमतीची संपत्ती जप्त केली गेली आहे.

दरम्यान, विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या विजय मल्ल्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्याची जी मागणी करण्यात येत आहे. त्याविरोधात तो खटला लढत आहे. जर विजय मल्ल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय मल्ल्याविरोधातील पहिली मोठी वसुली ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!