Share

‘काँग्रेस सरकारांनी केलेली कर्जमाफी हे आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचं मोठं उदाहरण’

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

सरकार कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे. पण शेतकऱ्यांनी तसं लेखी लिहून द्यावं अशी मागणी केली. सरकार ते करण्यास देखील तयार होतं. मात्र, आंदोलकांनी अचानक भूमिका बदलत कायदेच रद्द करण्याची मागणी केली. याचा अर्थ, आंदोलकांमध्ये एक गट असा आहे ज्यांना यातून मार्गच काढायचा नाहीये अशी शंका व्यक्त करत भाजप नेत्यांनी विरोधकांचा या आंदोलनाआडून काही विघातक इरादा असल्याची टीका केली होती. भाजप नेत्यांचा रोख हा काँग्रेसच्या कृषी कायद्यांच्या विरोधाकडे असलेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी कल्याण कार्यक्रमास संबोधित केले. नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

यासोबतच, ‘काँग्रेस सरकारांनी केलेली कर्जमाफी ही आपल्या देशातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं मोठं उदाहरण आहे. 2 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात निवडणुका होणार होत्या तेव्हा 10 दिवसांत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले?’ असा सवाल देखील पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला.

‘शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवणारे लोक किती निर्दयी आहेत याचा स्वामीनाथन समितीचा अहवाल हा एक उत्तम पुरावा आहे. या लोकांनी स्वामीनाथन समितीच्या शिफारशी 8 वर्ष दाबून ठेवल्या होत्या. शेतकरी आंदोलन करायचा, निषेध करायचा पण या लोकांना काही फरक पडला नाही’ अशी टीका देखील त्यांनी करत हे सरकार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं देखील सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!