मुंबई : सद्या महागाईमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनाचा प्रसार देशात होताच, या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अचानकपणे टाळेबंदी करण्यात आली. या ताळेबंदीमुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले. त्यामुळे सामन्यांना आपला रोजगार गमवावा लागला. २०२० चं स्वर्गीय डॉ. अब्दुल कलाम यांचं व्हिजन पूर्ण करू पाहणाऱ्या मध्यमवर्गाला तर इकडं आड तिकडं विहीर अशा प्रस्थितीमधून जावं लागत आहे.
कर्जाचा बोजा वाढलेल्या जनतेला आता पेट्रोलच्या महागाईचा फटका सोसावा लागत आहे. हळूहळू वाढ होत पट्रोल आता नव्वदी पार गेलं आहे. त्यामुळे आर्थिक हालापेष्टा वाढतच आहेत. आजही राज्यात पेट्रोल नव्वदी पारचं असलेलं पाहायला मिळालं. आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर ९०.३४ रुपये तर डिझेल ८०.५१ रुपये प्रति लिटर असून हे भाव स्थिर आहेत.
इंधन दर वाढीमुळे सामान्यांच्या खिशावर ताण वाढत असून भाजप नेत्याने मात्र या दरवाढीला काँग्रेस-महाविकास आघाडीला जबाबदार धरल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते अवधूत वाघ यांनी एका ट्विटद्वारे भाजपशासित राज्यातील पेट्रोलचा भाव व काँग्रेस-महाविकास आघाडी शासित राज्यातील पेट्रोलचा भाव यांची तुलना केली आहे. ‘पेट्रोलचे कालचे रेट (17/12/2020) गुजरात:80.9 (बीजेपी) हरियाणा:82.0 (बीजेपी) ऊ. प्रदेश:83.5 (बीजेपी) राजस्थान:93.5 (कांग्रेस) महाराष्ट्र:93.8 (कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादी)’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.
पेट्रोलचे कालचे रेट
(17/12/2020)
गुजरात:80.9 (बीजेपी)
हरियाणा:82.0 (बीजेपी)
ऊ. प्रदेश:83.5 (बीजेपी)
राजस्थान:93.5 (कांग्रेस)
महाराष्ट्र:93.8 (कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादी)— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) December 18, 2020
महत्वाच्या बातम्या
- पडळकरांच्या बोलवत्या धन्याने त्यांना आवरावे; मुश्रीफांनी दिला इशारा
- पंतप्रधानांच्या ‘हर घर वीज’ उद्दिष्टाला हरताळ; कोटेशन भरूनही राज्यात ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत !
- नव्या कृषि कायद्यांचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
- …म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याच्या खात्म्यासाठी खा. नाईक-निबाळकरांनी मागवलं हेलिकॉप्टर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

