सोलापूर : राज्यात सद्या वेगवेगळ्या भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचे वृत्त दिवसेंदिवस वाढत आहे. करमाळा तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्याला मारण्यात यश आलं आहे. हा बिबट्या वांगी, सांगवी, ढोकरी, चिखलठाण, शेटफळ, उंदरगाव या भागातील ऊस व केळीच्या शेतात वावरत असल्याचं गेल्या काही दिवसात आढळलं होतं.
मात्र, गेल्या १५ दिवसांपासून वनविभागाला या बिबट्याचा नेमका शोध घेणं अवघड जात होतं. या बिबट्याने सोलापूर भागातील ३ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे वनविभागाने या बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत होते. यानंतर, बारामतीहून खास शार्प शुटर देखील बोलावण्यात आला होता. त्यांना देखील काही दिवस यश आलं नाही.
अखेर आज या शार्प शूटर्स च्या ग्रुपमधील एकाला बिबट्याला संपवण्यात यश आलं आहे. बिबट्याला वांगी नंबर चार, राखुंडे वस्ती (ता. करमाळा) चार येथे शार्प शूटरने गोळ्या घालून ठार केले. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याचा गोळीने वेध घेतला आणि सोलापूरकरांवरचं संकट संपलं.
कोण आहे हा शुटर?
अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.
महत्वाच्या बातम्या
- आज केबीसीच्या कर्मवीर भागात ‘डिसले गुरुजी’ खेळणार खास कारणास्तव!
- हुश्श! अखेर करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याचा खेळ खल्लास
- नव्या कृषि कायद्यांचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
- …म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- भाजपशासित राज्यात पेट्रोल स्वस्त तर काँग्रेस-महाआघाडी शासित राज्यात पेट्रोल नव्वदी पार; भाजप नेत्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

