मुंबई : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित करण्यात आला. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणाऱ्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अशातच, महाराष्ट्रासह भारताचीही मान उंचावणारे डिसले गुरुजी आता ‘कौन बनेगा करोडपती’च्या कर्मवीर एपिसोडमध्ये झळकणार आहेत. कौन बनेगा करोडपती कर्मवीर मध्ये आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी वा देशासाठी अमूल्य काम करणाऱ्या व्यक्ती एका खास कारणाच्या पुरस्कारार्थ खेळण्यासाठी दाखल होत असतात.
डिसले गुरुजी देखील अशाच एका खास कारणासाठी या मंचावर येणार आहेत. या खेळात उषा खरे या त्यांच्यासोबत सहभागी होतील. त्या मुलींना चांगली सुरक्षा कशी पुरवता येईल आणि त्यांना आपल्या पायावर कसे उभे करता येईल यावर काम करतात. डिसले गुरुजी तंत्रज्ञानावर भर देऊन शिक्षणपद्धती कशी सुधारली जाईल यावर काम करतात.
उषा खरे आणि रणजित डिसले यांच्यासोबत कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर एपिसोडमध्ये अभिनेता बोमन ईरानी देखील येणार आहेत. ते दोघांना चांगले पैसे जिंकण्यास मदत करतील. हा भाग आज रात्री ९ वाजता सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नाही; येत्या काळात तीव्र संघर्ष करण्याचा ओबीसी जन-मोर्चाचा इशारा
- हुश्श! अखेर करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याचा खेळ खल्लास
- नव्या कृषि कायद्यांचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
- …म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- भाजपशासित राज्यात पेट्रोल स्वस्त तर काँग्रेस-महाआघाडी शासित राज्यात पेट्रोल नव्वदी पार; भाजप नेत्याचा दावा


