मुंबई : सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल ७१ लाख ६८ हजार ५९६ विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आले आहे. निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास विजजोडणी कापण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. वीजबिल भरण्यासाठीची मुदत ३० जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर विजेची जोडणी कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसे आदेश सरकारने महावितरणला दिले आहेत.
यामुळे संतप्त झालेल्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे, “सरकारचाच फ्यूज उडाला आहे. अनेक लोकांना ५० हजारांपेक्षा जास्त वीजबिलं आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल,” अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर केली.
“सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जी वेळ दिली ती फार चुकीची आहे. अनेकांचे ऑफिसेस हे दहाला सुरू होतात. संध्याकाळी बंद होतात. त्यामुळे सरकारने लोकलच्या वेळेमुळे नोकरदार वर्गाला काहीही फायदा होणार नाही,” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पक्ष कोणताही असो समाजाची बाजू मांडणार- आमदार सुरेश धस
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने ‘महाराष्ट्रातचं’ होणार ?
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

