🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मंत्री भुमरे यांच्या विरोधात मा.आ. वाघचौरे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी योगेश सोलाटे यांच्या मातोश्रींना पाठींबा देत भूमारेंसमोर मोठे आवाहन उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे.
जिल्हा बँकेच्या सोसायटी मध्ये भुमरे यांचे चांगलेच वर्चस्व आहे. ते मागील दोन्ही निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे. मात्र यंदा भुमरे यांना सोलाटे यांच्या मातोश्री कडून आव्हान मिळाल्यामुळे यंदा बिनविरोध निवडून येण्याची त्यांची संधी हुकली आहे. त्यातच तांत्रिक कारणाने मा.आ. वाघचौरे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी हि, सोलाटे यांना पाठींबा दिला आहे.
याच मतदार संघातुन माजी आ. वाघचौरे यांनी अर्ज दाखल केल्यावर सोलाटे यांनी वाघचौरेंना पाठींबा देण्याचे ठरवले होते, माञ वाघचौरेंचाच अर्ज बाद होत असल्याने त्यांनी आपला पाठींबा श्रीमती सोलाटे यांना जाहीर केला असुन तसे त्यांनी नुकतेच पञकार परिषदेत जाहीर करुन सोलाटे व वाघचौरेंनी ना. भुमरे यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


