Share

लॉकडाऊनमध्ये व्हिआयपींना दर्शन, वैद्यनाथ ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी

Published On: 

बीड : महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी परळीतील वैद्यनाथ देवस्थानच्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चौकशी करण्याची मागणी केली होती. शासनाकडून विधी व न्याय विभागामार्फत धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडून सह धर्मादाय आयुक्त बीड यांना दि.२३ डिसेंबर २०२० ला आदेश चौकशीचे देण्यात आले आहेत. मात्र, आजतागायत चौकशी झालेली नाही. यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी परत चौकशी करून वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमाचे केंद्र व राज्य सरकारकडून मंदिर, मस्जिद, दर्गा व गुरुद्वारा बंद ठेवण्याचे आदेश असतानाही परळीच्या वैद्यनाथ मंदिरात ट्रस्टीच्या लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी मंदिराचा गैरवापर करून व्हीआयपींना दर्शन देण्यात आले आहे. असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पुन्हा केलेला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिवभक्त वैद्यनाथ पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येत नव्हते तर पायरीचे व कळसाचे दर्शन घेण्यासाठी येत होते तरीही शिवभक्तांना ट्रस्टच्या मार्फत सुरक्षा रक्षकांकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आलेली आहे. याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केलेली आहे. लॉकडाऊन मधील सर्व फुटेज तपासून वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणीचे आदेश देऊनही का कारवाई केली जात नाही, असा सवाल उपस्थित काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!