Share

धक्कादायक! अत्याचारातील आरोपीसोबतच पोलिसांची हॉटेलमध्ये पार्टी

Published On: 

बीड : अत्याचाराच्या गुन्ह्यात २० वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीला न्यायालयातून कारागृहात सोडताना मध्येच दोन पोलिसांनी एका हॉटेलात जाऊन आरोपीसोबत मद्यपार्टी केल्याचा प्रकार समोर आला होता. ही बाब माहित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उपअधीक्षक (गृह) स्वप्निल राठोड हे याप्रकरणी चौकशी करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, मूकबधिर तरुणीवर सालगड्याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. मंगळवारी आरोपी तुकाराम कुडूक याला सत्र न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान, मंगळवारी रात्री शिक्षा झालेल्या आराेपीला न्यायालयातून कारागृहात सोडण्यापूर्वी त्याला घेऊन जाणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबतच एका हॉटेलात जाऊन मद्यपार्टी केली होती.

हा प्रकार समोर आल्यानंतर याची गंभीर दखल घेतली गेली आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी या दोन्ही पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनीही याप्रकरणी गंभीर दखल घेत या प्रकरणाची माहिती मागवली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!