Share

महाराजांनी अनावधानाने घेतले चुकीचे नाव, माजी आमदाराने केला नावातच बदल

Published On: 

बीड : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी भीमराव धोंडे यांचा भीमरावऐवजी भीमसेन असा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्याच आदेशाने मी भीमरावऐवजी भीमसेन असे नामकरण केले असल्याचे येथील भाजपचे आमदार धोंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आष्टी येथील भगवान महाविद्यालयात गुरुवारी सायंकाळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत बोलताना धोंडे म्हणाले की, जानेवारी महिन्यामध्ये गहिनीनाथ गडावर राष्ट्रसंत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राजकीय पदाधिकारी यांच्यासह भाविक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत महंत विठ्ठल महाराज यांच्या वाणीतून भीमरावऐवजी भीमसेन असे आल्याने मी याबाबत विहित नमुन्यातील प्रस्ताव नाव आणि वय आणि बदलण्याच्या कार्यालयात दाखल केला होता.

त्यानुसार या कार्यालयाने ४ मार्च २०२१ रोजी राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केले. आता येथून पुढे मला भीमरावऐवजी भीमसेन म्हणून नाव संबोधित करावे, असेही माजी आ. धोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी नावात बदल केल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, भीमराव उर्फ भीमसेन धोंडे हे आष्टी मतदारसंघातून चार वेळेस आमदार राहिलेले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून नशीब आजमावले. परंतू राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंकडून ते पराभूत झाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!