बीड : बीड तालुक्यातील बोरफडी येथील स्वस्त धान्य वितरण रेशन दुकानदाराकडून धान्याचे वितरण नियमीतपणे केले जात नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली होती. यासंदर्भात आ.विनायक मेटे यांनी सभागृहात विषयावर चर्चा केली.बीड तालुक्यातील बोरफडी येथील स्वस्त धान्य वितरण करणाऱ्या रेशन दुकानदाराकडून धान्याचे वितरण केले जात नसल्याने त्यांच्या विरुध्द लेखी तक्रार होवूनही अद्याप कारवाई होत नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे.
अनेक वेळा सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड, अन्य यंत्रणा तसेच दुकानदार हे यामध्ये काळाबाजार करतात व आपापसांत धान्य वाटून घेतात. याबाबतीत बोरफडी गावाला प्रत्यक्ष माल न जाता इतर ठिकाणी माल जात असतांना गावकऱ्यांनी तो माल पकडला परंतु प्रत्यक्षात तेथे कोणतीही यंञणा आली नाही. शेवटी तहसीलदार बीड त्या ठिकाणी आले व त्यांनी तो माल काळ्या बाजारात विकून टाकला असा स्पष्ट आरोप आ.विनायक मेटे यांनी सभागृहामध्ये केला.
यासंदर्भात धान्य दुकानदार घुगे याच्यावर कारवाई होईल का? जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड तहसीलदार, बीड यांची चौकशी करणार का?, असा सवालही आ. मेटे यांनी केला.ज्यांच्या हक्काचे धान्य आहे त्या बोरफडी गावातील ग्रामस्थांना हा माल केव्हा भेटणार याचेही उत्तर देण्यात यावे, अशी मागणी आ.मेटे यांनी म.वि.प.नियम ९३ अन्वये सभागृहात केली. या प्रश्नाचे उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी आ.विनायक मेटे यांनी विचारलेला प्रश्न योग्य असल्याचे मान्य केले व बोरफडी गावातील ग्रामस्थांना धान्य वितरित करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे सांगितले. तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला कलेक्टर व्हायचंय!’, चिमुकलीच्या उत्तराने सीईओ गोंदवले भारावले
- झाले मोकळे आकाश! ‘नभांगणा’मुळे पांढरीतील मुलांसाठी शिक्षणाचे दार खुले
- धक्कादायक! अत्याचारातील आरोपीसोबतच पोलिसांची हॉटेलमध्ये पार्टी
- महाराजांनी अनावधानाने घेतले चुकीचे नाव, माजी आमदाराने केला नावातच बदल
- २१ मार्चला परीक्षा झाली नाही, तर पडळकरांनी दिला वर्षासमोर उपोषणाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

