Share

झाले मोकळे आकाश! ‘नभांगणा’मुळे पांढरीतील मुलांसाठी शिक्षणाचे दार खुले

Published On: 

औरंगाबाद : अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या नभांगण फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि पांढरी (पिंपळगाव) येथील गावकऱ्यांच्या लोकसहभागातून येथील जिल्हा परिषदेची शाळा चांगला आकार घेत आहे. नभांगण फाउंडेशनने पुढाकार घेऊन मागील पाच वर्षात बेंबळा नदीचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे उभारले. त्यानंतर शाळा कायापालट करण्याचे काम हाती घेतले. पूर्वी अगदी दोन पडीक वर्ग होते. आता पाच वर्ग, स्टाफ रूम, एक स्वतंत्र किचन रूम, दोन स्वच्छता गृह आणि प्ले ग्राउंड विकसित केले.

शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी शुक्रवारी (दि.१२) या शाळेला भेट दिली. जिल्हा परिषदेकडून शाळेला जे काही हवे असेल त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जातात, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ही नक्कीच दर्जेदार शाळा म्हणून समोर येईल, असा विश्वास सीईओ मंगेश गोंदवले यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री देशपांडे, शालिनी मोर्या आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राजश्री देशपांडे म्हणाल्या की, नदी पुनरुज्जीवन आणि स्वच्छतागृहांबाबत काम केल्यानंतर शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. प्रामुख्याने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना कशा शाळेत जायला आवडेल, याचा विचार करून शाळेची रचना केली. वर्क, स्टाफरुम, प्लेग्राऊंड आणि स्वतंत्र किचन तयार केले. प्रत्येक भिंतीचा पुरेपुर वापर करून त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती जाण्याची व्यवस्था केली.

शाळा रंगबिरंगी केल्यामुळे आपोआपच मुलांमध्ये शाळेबद्दल अधिकाधिक गोडी निर्माण झाली. त्याशिवाय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान शिकवू इच्छित व्यक्तींनी पुढाकार घेऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन कार्यशाळा, आठवड्यातून दोनवेळा प्रत्यक्ष किंवा चर्चासत्र आयोजित करावे. ज्यामुळे शिक्षणासह इतर विषयांतही विद्यार्थी पारंगत होतील.

तीस विद्यार्थ्यांची वाढ
शाळेचे कायापालट करण्याचे काम सुरू झाल्यानंतर ६० विद्यार्थी संख्या वाढून ९१ वर पोहोचली आहे. आता ही संख्या वाढविण्यासह शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा आणखी वाढवायचा आहे. त्याचबरोब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे नभागंण फांऊडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!