Share

‘मला कलेक्टर व्हायचंय!’, चिमुकलीच्या उत्तराने सीईओ गोंदवले भारावले

Published On: 

औरंगाबाद : नभांगण फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि पांढरी (पिंपळगाव) येथील गावकऱ्यांच्या लोकसहभागातून जिल्हा परिषदेची शाळा चांगला आकार घेत आहे. यासाठी शाळेचे शिक्षकही प्रयत्नशील आहे. ही नक्कीच दर्जेदार शाळा म्हणून समोर येईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी शुक्रवारी (ता. १२) व्यक्त केला. यावेळी सहावीतील विद्यार्थिनी मुक्ता मोरे हिने इंग्रजीतून स्वतःची आणि गावाची ओळख करून दिली. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदवले यांनी, ‘तुला काय व्हायचंय’ हे विचारले. तेव्हा तिने उत्तर दिले,’ मला कलेक्टर व्हायचंय.’ या उत्तराने भारावून त्यांनी मुक्ताला पाचशे रुपयांचे बक्षीस दिले.

यावेळी हिंदी अभिनेत्री तथा नभांगण फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री देशपांडे, शालिनी मोर्या, प्रवीण अस्वले, शिक्षण अधिकारी सूरज जैस्वाल, विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, केंद्रप्रमुख किरण जाधव, मंदा पवार, दीपाली चौरे, सरपंच दीपक मोरे, योगेश कल्लोरे, संजय मोरे, शिवाजी कल्लोरे, बाळू मोरे, बाळासाहेब मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सीईओ गोंदावले म्हणाले की, जिल्हा परिषदेकडून शाळेला जे काही हवे असेल त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जातात, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

दोन वर्षात केला कायापालट
नभांगण फाउंडेशनने पुढाकार घेऊन मागील पाच वर्षात बेंबळा नदीचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर लोकसहभागातून २०० स्वच्छतागृह उभारले. त्यानंतर शाळा कायापालट करण्याचे काम हाती घेतले. पूर्वी अगदी दोन पडीक वर्ग होते. आता पाच वर्ग, स्टाफ रूम, एक स्वतंत्र किचन रूम, दोन स्वच्छता गृह आणि प्ले ग्राउंड विकसित केले.

तीस विद्यार्थ्यांची वाढ
शाळेच्या कायापालट करण्याचे काम सुरू झाल्यानंतर ६० विद्यार्थी संख्या वाढून ९१ वर पोहोचली आहे. आता ही संख्या वाढविण्यासह शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा आणखी वाढवायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!