मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलच्या युतीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सूचक विधान केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी बोलताना योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
एका बाजूला फडणवीस यांच्या वक्तव्याची चर्चा होत असताना आता दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
‘राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात. राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केले आहे. मात्र, या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील’, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास
- मोदी-पवार भेटी बाबत जयंत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले…
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- गोवंडीतील रस्त्याला ‘टिपू सुलतान’चं नाव देण्यास भाजपने पाठिंबा दिला होता – शिवसेना
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

