नवी दिल्ली- महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहेत. यातच आता पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
मोदींच्या भेटीपूर्वी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले. मोदी आणि पवार यांच्यात पंतप्रधान कार्यालयात जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेतील तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र त्यात सहकार आणि बँकिंग क्षेत्राबद्दल प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
दरम्यान, या भेटीबाबत आता राष्ट्रवादीकडून खुलासा करण्यात आला असून नागरी आणि सहकारी बँकांवर रिझर्व बँकेने आणलेल्या निर्बंधांच्या बाबत ही भेट झाली असल्याचं सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच हा खुलासा सोलापुरात बोलताना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास
- मोदींना भेटण्याआधी पवारांनी घेतली भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांची भेट
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- गोवंडीतील रस्त्याला ‘टिपू सुलतान’चं नाव देण्यास भाजपने पाठिंबा दिला होता – शिवसेना
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी


