Share

गोवंडीतील रस्त्याला ‘टिपू सुलतान’चं नाव देण्यास भाजपने पाठिंबा दिला होता – शिवसेना

Published On: 

मुंबई – गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे. राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

गोवंडी साहीनाका डंपिंग ग्राऊंड येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यावरून गुरुवारी झालेल्या बाजार उद्यान समितीच्या बैठकीत भाजपने प्रचंड गोंधळ घातला. संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे माहिती मागवून प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवल्याचे बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी जाहीर करूनही भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता.

या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. 2013 मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या आणि भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच महापौरांनी सादर करून भाजप नाहक खोटेपणा करीत असल्याचा आरोप केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!