मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते भाजप ,मध्ये जाणार का? या चर्चांना उधान आलं आहे.
मात्र आता एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार झाले आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय.
आमदारांच्या जीवाला धोका असल्याच संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. अनेक आमदारांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात तक्रारी केल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
संघटनेला तडा गेला नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आमदारांचं अपहरण केलं असल्याच संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात आता शिवसेनेला यश येईल का? पुढे काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –


