🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नाराजी असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच ३ मंत्री नॉट रिचेबल आणि १३ आमदार असल्याचीही माहिती समोर आली होती. हे सर्व आमदार आणि मंत्री हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने सर्व आमदार,मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा वर्षा बंगल्यावर बोलावले आहे. या बैठकीच्या निमित्ताने किती आमदार आपल्यासोबत आहे, याची गणना केली. यात संख्याबळ किती आहे, हे सिद्ध झालंय. या बैठकीला ५५ पैकी केवळ १८ शिवसेना आमदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे ट्वीट एकानाथ शिंदे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
