मुंबई : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन गुजरात गाठले असल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेतेही आहेत, यांच्या पदाबाबद आता मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे ट्वीट एकानाथ शिंदे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदेंनी दोन प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवले आहे. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सोबत सरकार स्थापन करावं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं. असा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

