मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. काल गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
आज हे चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या बाजूने गुजरातच्या दिशेने चालले असून सकाळपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एकाबाजूला खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून भरती काळात ४ मीटर उंचीच्या लाटा येण्याच्या शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे किनारा भागासह मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
चक्रीवादळ गुजरात दिशेने चालले असले तरी महाराष्ट्रावरील धोका कायम आहे. येत्या २४ तासांमध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टी अतिमुसळधार पावसाचा इशारा आता मुंबई हवामान खात्याने दिला आहे. तसेच तशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून प्रशासनाच्या सज्जतेची माहिती उद्धव ठाकरेंनी केंद्राला दिली आहे. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग हा प्रचंड वाढला असून गुजरातचा धोका वाढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खतरो के खिलाडी’ शो खतरे मे! १२ भागानंतर कार्यक्रम होणार बंद
- ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
- मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – घाटगे
- तयारी तिसऱ्या लाटेची! जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोविड बाल रुग्णालय होणार सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

