मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. वादळामुळे मांडवी समुद्रात अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली, तर काही घरांचंही नुकसान झालं आहे.
तोक्ते वादळ आज रात्रीच पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. या वादळाने रौद्रवतार धारण केला आहे. रविवार सायंकाळपासूनच या वादळाचं स्वरुप तीव्र होताना दिसून आलं. सोमवार सकाळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईहून हे वादळ गुजरातला जाणार यावरुन भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव
संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार. ????@BJP4India @BJP4Maharashtra
— Unmesh Patil (@UnmeshBPatil) May 16, 2021
‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव असून संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’ अशा आशयाचे ट्वीट करून उन्मेश पाटील यांनी संजय राऊत यांना उपरोधिक टोला लगावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे सातत्याने शिवसेनेकडून भाजप ला टोला लगावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात मॉडेलवर टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर आज भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी संजय राऊत यांना उपरोधिक टोला लगावला असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
- अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘हा’ षटकार पाहून तुम्हाला येईल धोनीची आठवण…
- ‘दिलेले वचन केले पूर्ण’, ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर
- तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत
- #तोक्ते चक्रीवादळाचा कोल्हापूरलाही फटका; घरांसह शाळांचे छत उडाले, लाखोंच नुकसान


