मुंबई : दुरचित्रवाणी क्षेत्रात अनेक प्रकारचे रियालीटी शो सुरु असतात यात काही कार्याक्रम हे गाण्याचे तर काही कार्यक्रम हे न्यृत्यावर आधारित आसतात. मात्र यात एक कार्यक्रम वेगळ्या धाटणीचा असतो. तो कार्यक्रम म्हणजे ‘खतरो के खिलाडी’ हा शो.
खतरो के खिलाडी हा कार्यक्रम त्यातील चित्तथरारक स्टंट आणि अॅक्शनमुळे लोकप्रिय आहे. सध्या या कार्यक्रमाचे चित्रीकरण हे केपटाउनमध्ये सुरु आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार कोरनाच्या सावटामुळे या कार्यक्रमाची पुर्ण टीम लवकरच भारतात परतणार आहे. कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाचे नियम यामुळे या कार्यक्रमातील सर्व टीमला लवकर भारतात परत्यान्याचे आदेश मिळाले आहे.
https://www.instagram.com/p/CO4ZujLsMdM/
या कार्यक्रमाची टीम ही २२ जुनपर्यंत भारतात पोहोचणार होती. मात्र भारतात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असल्याने या कार्यक्रमाच्या निर्मात्याने या कार्यक्रमाचे चित्रीकरण लवकर आटपुन भारतात परत येण्याच आदेश दिले आहेत. यामुळे ‘खतरों के खिलाड़ी ११’ हा कार्यक्रम एकूण १२ भाग झाल्यानंतर बंद केला जाणार आहे. केपटाउनमधली शूटिंग पूर्ण करून सगळी टीम येत्या महिन्याभरात पुन्हा भारतात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून 102 वी घटना दुरुस्ती रद्द करा, 50 % आरक्षण मर्यादेची अटही काढा : कॉंग्रेस
- मायकेल वॉनच्या टिकेवर सलमान बट्टने दिले ‘हे’ चोख प्रत्युत्तर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
- ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा


