औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता मनपा आवश्यक तयारी करत आहे. गरवारी कंपनी मध्ये बालकांसाठी शंभर खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येत आहे. ते काम लवकरच पूर्ण होऊन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हॉस्पिटल कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली.
शहरात वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत सुमारे ८३ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात १७०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञ डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी सुरू केली आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय चिकलठाणा येथील गरवारे कंपनीच्या शेडची पाहणी करून कंपनीकडूनच ऑक्सिजन, शंभर खाटांचे रुग्णालय उभारून देण्याची विनंती केली. आणि कंपनीनेही उभारून देण्याची तयारी दर्शवली.
त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गरवारे कंपनीच्या शेडची पाहणी करून त्याठिकाणी बालकांसाठी शंभर खाटांचे हॉस्पिटल तयार करण्याची सूचना केली. शून्य ते बारा वर्षे वयोगटातील बालकांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यास त्या बालकांना पालकांसह या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी असेही केंद्रेकर यांनी सांगितले.
त्यानुसार गरवारे कंपनीत कोविड बाल रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले आहे. शहरात एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. मात्र गरवारे कोविड सेंटर मधील सुविधा आणि अडचणी यांचा विचार करूनच एमजीएमचे बाल कोविड सेंटर उभारले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
- ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
- मायकेल वॉनच्या टिकेवर सलमान बट्टने दिले ‘हे’ चोख प्रत्युत्तर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

