Share

कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा

Published On: 

मुंबई   – गेल्या काही दिवसांपासून कुकडीच्या पाण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. मात्र आता  कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.

पिंपळगाव जोगे धरणाच्या लाभ क्षेत्रातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे कुकडीच्या पाणी आवर्तनाला स्थगिती मिळाली होती. यासंबंधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील असे आश्वासित केलेलं आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करून सगळ्यांची काळजी कायमची मिटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे  देखील त्यांनी सांगितले.

कुकडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील जुना प्रकल्प आहे. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. परंतु आता ३० ते ४० वर्षांनंतर पाण्याच्या मागणीनुसार काही बदल करणे आवश्यक आहे. या कामासाठी या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. ही महाविकास आघाडी सरकारची महत्वाची उपलब्धी ठरेल असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!