हिंगोली : मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वारे तसेच अवकाळी पावसामुळे हळदीच्या पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वेळी अचानक आलेल्या पावसामुळे वाळवायला ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांना खुप मोठी धावपळ करावी लागली. दरम्यान हळदीचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले.
मंगळवारी ढगाळ वातावरणासह वादळी वारे देखील वाहू लागले तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकाची काढणी देखील जोमाने सुरु आहे. वसमतसह कुरुंदा, कौठा, पार्डी, औंढा नागनाथ परिसरातमध्ये अर्धा तास पाऊस पडला, या पावसामुळे नर्सी नामदेव, दांडेगाव, पोत्रा, डिग्रस, कोंढूरसह आजुबाजुच्या परिसरात पावसाच्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस देखील पडला.
या मुळे शेतातील आखाड्यावरील पत्रे उडून गेले आहेत. तर कळमनुरी तालुक्यातील घोळवा, जवळा, पांचाळ, डोंगरकडा, घोडा कामठा, सोडेगावासह परिसरात देखील खुप शेताकऱ्यांची या पावसादरम्यान धावपळ करावी लागली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तर हळदीसह उन्हाळी भाज्यांचे देखील खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

