बीड : मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात मागच्या चार दिवसात कमी अधिक पाऊस सुरू असला तरी बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अतिवृष्टीचा फार मोठा फटका बसला आहे. ६७ मंडळात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असुन उभ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. नुकसानग्रस्तांना किमान हेक्टरी पन्नास हजारांची मदत दिली तर तरच या संकटातून शेतकरी बाहेर पडेल असे त्यांनी म्हटले.
गेल्या चार-पाच दिवसापासुन संपुर्ण मराठवाड्यात कमी-जास्त पाऊस पडत असला तरी दोन दिवसापूर्वी बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अक्षरश: पावसाने धुवुन काढले. नदी नाले महापुर आल्याने काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकासह खरडुन गेल्या. एकुण ६७ मंडळात अतिवृष्टी झाली. सोयाबीन, कापसासारख्या पिकात आजही गुडघ्याइतके पाणी भरलेलं दिसत आहे. वास्तविक पाहता मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. खरीपाची पिके पदरात पडली नाहीत. आता पिकं धानाच्या भरात असताना निसर्गाचं ओढवलेलं संकट शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त करण्यासाठी कारणीभुत ठरत आहे.
नांदेड जिल्ह्यात काही लोक वाहुन गेले तर अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे संसार उद्धवस्त झाले. शंभर मिमि.पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद अनेक तालुक्यात आहे. नैसर्गिक संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सापडल्यानंतर सरकारच्या भुमिकेकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्याची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पिक विमा जो नियमित मिळायचा तो दोन वर्षापासुन मिळत नाही. सरकार बघ्याची भुमिका घेत असल्याने संतापाची लाट मराठवाड्यात पसरली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने पाच जिल्ह्यात धुमाकुळ घातला. अतोनात नुकसान झालं. खरं तर आता पंचनामे करत कागदोपत्री घोडे नाचवण्याची ही वेळ नाही. या सरकारला शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची काही कीव येत असेल तर मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बांधावर जावुन प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तत्काळ देण्याची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पाठीत खंजीर खुपसणारे कोण असं म्हटल्यावर आता दोन चेहरे डोळ्यासमोर येतात – चंद्रकांत पाटील
- ‘तुम्ही केलेला गुन्हा सामान्य नाही’ ; न्यायालयाचा आसाराम बापूला ‘सर्वोच्च’ धक्का
- ‘आता रडणार नाही तर फक्त लढणार’, संजना जाधव यांचा निर्धार !
- ‘GDP वाढला म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किंमतीत वाढ’, राहुल गांधींचा मोदींना टोला
- ‘एकाला ईडीची नोटीस आली कि लॉकडाऊन, हे चालणार नाही; वसूली सोडून दुसरीकडेही लक्ष द्या’


