नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आसाराम बापूला वैद्यकीय आधारावर जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आसाराम यांनी वैद्यकीय आधारावर 6 आठवड्यांसाठी जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
आसारामला मेडिकलच्या आधारावर अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं आसारामच्या आरोग्याच्या स्थितीचा अहवाल ‘एम्स’ रुग्णालयाकडून मागवून घेतला होता. ज्या गुन्ह्यासाठी आसारामला दोषी ठरवण्यात आलंय तो सामान्य गुन्हा नाही. त्यामुळे आसारामवर सर्व प्रकारचे आयुर्वेदिक उपचार तुरुंगातच होतील, अशी टिप्पणीही यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.
दरम्यान आसारामला 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. 2013 मध्ये एका न्यायालयाने त्याला त्याच्या आश्रमातील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. मुलगी अल्पवयीन होती. किशोरने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, आसारामने तिला जोधपूरजवळील मनई भागात त्याच्या आश्रमात बोलावले आणि 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री तिच्यावर बलात्कार केला होता. आसाराम गेल्या ८ वर्षांपासून जोधपूरच्या सेंट्रल तुरुंगात बंद आहे. या आठ वर्षांत आसारामकडून जामीनासाठी खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अगणित अशा याचिका दाखल केल्या आहेत. परंतु, अद्याप त्याला जामीन मिळू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्याकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी संपवण्याचा फॉर्म्युला’, नाना पटोलेंचा दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजे उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट; राज्यातील प्रमुख पक्षांचे ‘हे’ नेते असणार सोबत
- सोमय्यांनी जाहीर केलं बारावं नाव; आता जितेंद्र आव्हाडांच्या मागे लागणार ईडीची पिडा ?
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- ‘भाजपा आता रामाच्या चारित्र्याचे ही लिंचिंग करत ; हिंमत असेल तर गोरेंवर कारवाई करा’

