Share

‘आता रडणार नाही तर फक्त लढणार’, संजना जाधव यांचा निर्धार !

Published On: 

औरंगाबाद : ‘मी आता रडत न बसता लढणार आहे. आत्तापर्यंत इतरांच्या साहाय्याने मी कार्यक्रम घेतले. व लोकं आले. परंतु आता पहिल्यांदा मी बोलावल आणि तुम्ही आले तेही एवढ्या मोठ्या संख्येने. म्हणून माझी जबाबदारी वाढलेली आहे. भास्कर पेरे पाटील यांच्या गाडीवरील ‘रडायचं नाही तर लढायचं’ या ब्रीद वाक्याचा संदर्भ देत आता पण रडणार नाही तर विरोधकां विरुद्ध लढणार आहे असे मत जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांनी व्यक्त केले. ग्रामविकासासाठी गावचा सहभाग या विषयावर आयोजित कन्नड येथील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

यावेळी उपस्थित आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे झाली तरी अजूनही गाव खेड्याचे प्रश्नच प्रश्न आहेत. संजनताई यांच्या मध्ये काम करण्याची भावना आहे. बाईच्या डोक्यात एखादी संकल्पना आली तर नक्की यशस्वी होते. हा इतिहास आहे आणि तेही यश्वस्वीपणे. पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकार मदत करते. पण शासनाच्या भरवश्यावर बसू नका. सरपंचांना उद्देशून जनतेचा पैसा इमानेइतबारे जनतेवर खर्च करावा. स्वतःचे काम स्वतः केल्याशिवाय विकास नाही.

जि. प सदस्य संजनाताई जाधव यांच्याविषयी बोलतांना ते म्हणाले की, संजना जाधव यांची कार्य करण्याची प्रामाणिक भावना आहे. यामुळे स्त्रियांच्या डोक्यात एखादी संकल्पना आली तर ती नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. असेही ते म्हणाले. तालुक्यात चर्चा आहेत की, संजनाला आमदार व्हायचंय परंतु मी माझ्या वडील, भावाच्या माध्यमातून राजकीय पदे जवळून पाहिले आहेत. मला पदाचा मोह नाही. १८ वर्षाचा कार्यकर्त्यांचा गोतावळा म्हणून त्यांचे समाधान करण्यासाठी अनुभव कारणी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस उदघाटक तथा जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव, पंचायत समिती कन्नडचे सभापती आप्पाराव घुगे, आदींनी पेरे यांचे स्वागत केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!