Share

सरकारच्या ‘नाकावर टिच्चून’ दहिहंडी फोडली, मनसे जिल्हाध्यक्ष दाशरथे यांचा दावा

Published On: 

औरंगाबाद : राज्यात दहिहंडी उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हडको परिसरात दहिहंडी फोडण्यात आली. हिंदू सण साजरा करण्यासाठी विरोध करणाऱ्या ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही दहिहंडी फोडली असल्याचा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केला आहे.

बंदी असतानाही दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल दाशरथे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली असली तरी त्याला मनसे कार्यकर्ते घाबरत नसल्याचेही ते म्हणाले. अस्वलाच्या अंगावरील केसांप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांवर कितीही केसस दाखल झाल्या तरी त्याला न घाबरण्याची शिकवण आम्हाला राज ठाकरे यांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पुढील काळातही या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते अशा प्रकारचे आंदोलन करत राहणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी जे करावे लागेल, ते जोदारपणे करणार असल्याचा दावाही या वेळी दाशरथे यांनी केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणाही या वेळी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!