Share

“दादा भूसेंनी विदर्भातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, निवडणूक आली म्हणून अमरावतीच्या दौऱ्यावर”, अनिल बोंडेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: राज्याचे कृषी मंत्री व शिवसेना नेते दादा भुसे (State Agriculture Minister and Shiv Sena leader Dada Bhuse) अमरावतीच्या दौऱ्यावर असून शिवसेनेचा पश्चिम विदर्भ मेळावा होत आहे. राज्य सरकारने केलेली महत्त्वाची कामे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे आणि नवी ऊर्जा शिवसैनिकांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असं दादा भुसे म्हणाले. मात्र त्यांच्या दौऱ्यावरच भाजपचे अनिल बोंडे (BJP leader Anil Bonde) यांनी दादा भूसेंनी विदर्भातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून निवडणूक आली म्हणून अमरावतीच्या दौऱ्यावर आल्याचे म्हटले आहे.

“अमरावतीमध्ये आलेल्या दादा भुसे यांनी नवीन प्रकल्प काही आणला नाही, परंतु मोराशी तालुक्यामध्ये मंजूर झालेला, निविदा काढलेला प्रकल्प हा स्वतःच्या मतदार संघात मालेगावला वळवला. हा जैविक खात्याचा प्रकल्प, हा प्रकल्प शेणावर प्रक्रिया करणार होता. शंभर लोकांना थेट रोजगार होता. शेतकऱ्यांच्या गाईचे शेण वापरले जाणार होते. हा प्रकल्प वळवतात त्यांनी निविदेला प्रतिसाद दिला नाही. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सायट्रासीस त्याचेही पैसे दिले नाही. यंदाची नुकसानभरपाईही दिली आहे. विमा दिला नाही.”, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1495356071728214019

तसेच पश्चिम विभागात १२५७ आत्महत्या झाल्या. त्या भगिनींनाही दादा भुसे भेटायला गेले नाही. आता निवडणूक आली म्हणून दादा भूसेंन अमरावती आठवली, मात्र जनता तुम्हाला माफ करणार नाही. विदर्भाचा केलेल्या विश्वासघाताचे फळ तुम्हाला भोगावे लागेल, असेही अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!