Share

सायबर अटॅक हा तांत्रिक विषय, बावनकुळेंना समजणार नाही : अनिल देशमुख

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल याबाबत मोठा खुलासा केला. मुंबईतील बत्ती गुल होण्यामागे चीनचा हात असल्याची माहिती त्यांनी दिली. चीनने सायबर हल्ला करून मुंबईत ब्लॅकआऊट घडवून आणला हा घातपाताच आहे. असे काल त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन सांगितले होते.

या सर्व प्रकरणावर भाजपने आता जोरदार हल्ला केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान गृहमंत्री व उर्जामंत्र्यांना चांगलेच धारेवर धरलेले आहे. ‘या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला. कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

संबंधित लाईन सायबर अटॅकच्या पातळीचा नाही. हा घातपात नाही, अधिकाऱ्यांनी चूक केली, समन्वय ठेवला नाही. अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहे, असे अशोभनीय कृत्य करणाऱ्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

याच आरोपांमुळे संतप्त झालेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून बावनकुळेंना चांगलेच फटकारले आहे. ‘मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हास करून घेऊ नये.’ अशा आशयाचे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

 

यामुळे आगामी काळात वीज यंत्रणेवर झालेल्या सायबर अटॅक पेक्षा सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील शाब्दिक अटॅकची चर्चा चांगलीच रंगेल एवढे मात्र नक्की.

 

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!