Share

खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयातून हायवाची चोरी, तिघे अटकेत

Published On: 

बीड : बीडच्या तहसीलदारांनी अवैध मुरूम वाहतूक प्रकरणी एक हायवा जप्त केला होता. त्यानंतर तो हायवा जिल्हाधिकारी कार्यालयातून आरोपींनी पळवून नेला. या घटनेमुळे प्रशासनाच्याच कारवाईवर संशय व्यक्त होत होता. मात्र, शिवाजीनगर पोलिसांनी गाडी पळवणाऱ्या चालक, मालकाला अटक केली आहे, आहेर वडगाव शिवारातून तिघांना ताब्यात घेतले, तर एक जण फरार झाला.

मिळालेल्या माहितीनूसार, बीडचे तहसीलदार शिरीष वमने यांनी अवैध मुरूम वाहतूक करणारा हायवा (एमएच २३ डब्ल्यू ४००९) हा तीन दिवसांपूर्वी पकडला होता. पकडलेला हा हायवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावून अधिकारी बैठकीसाठी गेले ही संधी साधून चालकाने व मालकाने संगनमत करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून हायवा पळवून नेला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पथक या हायवाचा शोध घेत होते. सोमवारी सकाळी हा हायवा आहेर वडगाव शिवारात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून हा हायवा त्याच्यासोबत एक दुचाकी ताब्यात घेतली. या वेळी हायवाचालक भाऊसाहेब खांडेकर, मालक गोरख सदाशिव राऊत आणि दिनकर विठ्ठल शिंदे या तिघांना ताब्यात घेतले, तर अन्य एक जण फरार झाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!