औरंगाबाद : कोरोना सारख्या गंभीर रोगाच्या काळात सर्व अडचणीत असताना महाविकास आघाडी सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सक्तीने वीजबिल वसूलन्यास सुरुवात केली होती. याला प्रतिसाद देत वाळूज एमआयडीसी परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वीजबिल देखील वसूल करण्यात आले होते. वसूल झालेल्या वीजबिलातून स्थानिक ठिकाणीच विकास करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते परंतु त्यांचे हे आश्वासन हवेतच असल्याचा अनुभव वाळूज परिसरातील नागरिकांना आला.
फ्लॅक्स कंपनी व रोलेक्स कंपनीच्या मीटरच्या सतत वाढत असलेल्या तक्रारी, ग्राहक निहाय नसलेले कर्मचारी, धोकादायक ट्रान्स्फार्मर बदलून द्यावे आदी विविध मागण्यासाठी कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे व उपकार्यकारी अभियंता प्रशात तोडकर यांची भेट घेऊन त्या मागण्या सोडविण्याची मागणी तिसगावचे उपसरपंच तथा शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली.
मागील अनेक दिवसापासून वाळूज एमआयडीसी परिसरातील सिडको भागात नागरिक महावितरणच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. त्याचा अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा महावितरण जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी मंगळवार (२) रोजी कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी उपअभियंता यांची भेट घेतली.
तिसगाव, वडगाव को, साजापूर या ठिकाणी नवीन उपकेंद्र उभारावे, म्हाडा काॅलनी येथील असुरक्षित विद्युत तारा/खांब ऐवजी केबल व मिनिपिलर ची उभारणी करून भूमिगत करावी, धोकादायक मिनी पिलर बदलावे, खराब मिटर काढुन आठवड्यात एक दिवस तपासणी करून आणण्यासाठी ची कायमस्वरूपी व्यवस्था करावी आदी मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले. या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन अधिकाऱ्याकडून देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणात तरुणानांही लाजवेल असा जेष्ठांचा उत्साह
- राज ठाकरे लावणार उदयनराजेंच्या आप्तेष्टांच्या विवाहाला हजेरी
- पूजा चव्हाण प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पुण्याचे पोलीस आयुक्त हसले आणि निघून गेले
- सातवीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
- खळबळ! जिल्हाधिकारी कार्यालयातून हायवाची चोरी, तिघे अटकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
