Share

राज ठाकरे लावणार उदयनराजेंच्या आप्तेष्टांच्या विवाहाला हजेरी

Published On: 

मुंबई : भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली होती. कौटुंबीक विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ते राज यांना भेटले होते. यावेळी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना यांना राजमुद्रा देखील भेट दिली होती. उदयनराजे हे पहिल्यांदाच ‘कृष्णकुंज’वर गेले होते. याबद्दल राज यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत अशी माहिती आता मिळत आहे. नाशिकमध्ये उदयनराजेंच्या आप्तेष्टाचा विवाह आहे. नाशिक दौऱ्यात राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करतील.

राज ठाकरे येत्या गुरुवारी म्हणजेच ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. परंतु, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणावर तोडगा निघावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या पूर्वी त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली होती. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावरही आले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!