औरंगाबाद : आई वडील कामावर गेलयावर सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थीनेने घराच्या दुसर्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गारखेडा परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे (वय.१४ रा.गल्ली क्र.४, आनंदनगर गारखेडा)असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संजीवनी ही इयता सातवी मध्ये शिकत होती. तिचे आईवडील दोघेही फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. नित्यानियमाप्रमाणे आई वडील व लहान भाऊ तिघेही फुटाणे विक्रीसाठी गेले होते.ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी आले असता घराचा बाहेरील दरवाजा बंद होता. तर घरात संजीवनी नव्हती. तिला आवाज दिला असता ती शेजारी गेली असावी असे घरच्यांना वाटले.
मात्र काही वेळा नंतर लहान भाऊ जेव्हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला तेव्हा संजीवनीने साडीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मीरा चव्हान अधिक तपास करत आहे. हसऱ्या खेळत्या संजीवनीने इतके टोकाचे पाउल का उचलले असावे हे समजू शकलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईकरांना बसणार आर्थिक भुर्दंड ! प्लॅटफॉर्म तिकिटात मध्य रेल्वेनं केली पाच पट वाढ
- नव्या नवरीचे नऊच दिवस; दहाव्या दिवशी झाला ह्रदयविकाराने मृत्यू
- माहिती अधिकाराचे उल्लघंन पडले महाग; ग्रामसेवकावर झाली कारवाई
- अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहेत ; दोघांनीही राजीनामा द्यावा
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली


