Share

पूजा चव्हाण प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पुण्याचे पोलीस आयुक्त हसले आणि निघून गेले

Published On: 

पुणे- 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मात्र पूजाच्या मृत्युच्या दुसऱ्याच दिवशी पूजासोबत असलेले अरुण राठोड व विलास चव्हाण यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले पुढे या प्रकरणात शिवसेनेचे वन मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.नुकताच या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

नुकताच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा अहवाल पुणे पोलिसांच्या हाती आला असून, सुरुवातीला प्राथमिक अहवालात जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता सविस्तर आलेल्या अहवालात देखील पुजाचा मृत्यू जबर दुखापतीमुळेच झाला असल्याचे म्हटले आहे. मणक्याला व डोक्याला जबर दुखापत झाल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे या सविस्तर अहवालात म्हटले आहे.

या प्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत पुणे पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत जात आहे. या टीकेनंतर देखील पुणे पोलिसांना पूजा प्रकरणी कितपत गांभीर्य आहे असा मुद्दा उपस्थित व्हावा असा काहीसा प्रकार पुण्यात घडला.

पुण्याचे पोलीस आयुक्त हे अमिताभ गुप्ता आहेत. आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची एक पत्रकार परिषद होती.या पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हसले आणि उत्तर न देताच निघूनही गेले.

पत्रकारांनी गुप्ता यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते व नुकताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पूजाच्या शव विच्छेदन अहवालात नेमके काय आले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गुप्ता यांनी पत्रकारांना कोणतेही उत्तर न देता पत्रकार परिषदेतून हसत हसत निघून गेले.

या सर्व प्रकारामुळे आता पोलिसांच्या भूमिकेबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत. पूजा चव्हाण प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नात नेमके हसण्यासारखे काय होते असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान,हे अमिताभ गुप्ता तेच आहेत ज्यांच्यावर टाळेबंदीच्या काळात कपिल आणि धीरज वाधवान बंधूंसह 23 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!