Share

मोबाईलला नो नेटवर्क, ‘हॅलो, हॅलो’ करून ग्राहक पार वैतागले

Published On: 

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील नागरिक सध्या मोबाईल नेटवर्कमुळे हैराण आहेत. विविध कंपन्यांच्या सेवेत अडथळा येत असल्याने नागरिकांनी आता करावे तरी काय असा प्रश्न पडला आहे. यामुळे दोघांमधील संभाषणामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. तर अनेकांना रेंज मिळत नसल्याने ग्राहक पार वैतागुन गेले आहेत.

कुंभार पिंपळगाव येथील ग्राहकांनी विविध मोबाईल कंपन्यांच्या महागड्या प्लॅनसाठी पैसे मोजूनही जालना, बीड जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या शिवनगाव, भादली नाथनगर, नागोबाची वाडी या सर्व ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. कुंभार पिंपळगाव परिसरात अनेक खाजगी मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारलेले आहेत.

त्यामुळे या भागातील मोबाईल धारकांनी मोठ्याप्रमाणावर या कंपन्याचे प्लॅन घेतलेले आहेत. परंतु, हॅलो हॅलो करुन ग्राहक पार वैतागले आहेत. मोबाईल कंपन्या अगोदर वेगवेगळ्या ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करतात. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर महागडे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या माथी मारतात. आता नेटवर्क नसल्याने संपर्कात व्यत्यय येत आहे. या कंपन्यांनी तात्काळ सेवा सुधारावी अन्यथा ग्राहक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात दिसून येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!