Share

‘सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी मंत्री केवळ घोषणाबाजी करण्यातच उत्साह दाखवत आहेत’

Published On: 

मुंबई : देशभरात सद्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान, आता या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुसफूस समोर आली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा समावेश करण्यावरून नितीन राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री व पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर मागवर्गीयांच्या या हक्कासाठी स्वतः देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

यासोबतच, त्यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवारांच्या निवडीवर देखील आक्षेप घेतला आहे. ‘ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का?’ असा सवाल देखील नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आम आदमी पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. खरेतर वंचित घटकांना प्रशासनात अपुरे प्रतिनिधित्व असेल तर पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यायला हवा. सर्वच प्रस्थापित पक्षांसाठी आरक्षणाचा विषय हा कुरघोडीच्या राजकारणाचा आणि जनतेस झुंजवत ठेवण्याचा मुद्दा झाला आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्री देखील विजबिल, शिक्षक पगार, शाळा फी, भ्रष्टाचार हे जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यावर केवळ गटबाजी,घोषणाबाजी करण्यातच उत्साह दाखवत आहेत अशी टीका आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी केली आहे .

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!