Share

‘तेजस’ चित्रपटातील कंगना रनौतचा नवा लूक प्रदर्शित

Published On: 

मुंबई : काल बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने 34वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने कंगनाने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपला आगामी ‘तेजस’ या चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे. या चित्रपटातील हा नवीन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोमध्ये कंगना एअरफोर्स अधिकारी असल्याचे दिसून येत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी कंगनाचा हा लूक शेअर केला आहे.

कंगना रनौतच्या ‘तेजस’ चित्रपटाबद्दल सांगायचे तर चित्रपटामध्ये महिला फाइटर पायलटची कहाणी आहे. कंगनाने या चित्रपटातील तिचे नाव देखील जाहीर केले आहे. या चित्रपटात ती ‘तेजस गिल’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे कंगनाने सांगितले. कंगना तेजसमध्ये शीख सैनिकाची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत कंगना एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘थलायवी’ असं आहे. त्याचा नुकताच ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांना फार आवडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!