लातूर : दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नावाने लातूर येथील सर्वोपचार रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले होते. कागदावर झालेल्या नामकरणाला प्रत्यक्षात अजूनही मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे नामकरण वर्षभरापूर्वी ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर’, असे केले आहे.
या संस्थेंतर्गत असलेल्या इमारतींवर ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर’ असे नामफलक लावण्यासाठी अधीष्ठाता कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकास मान्यताही दिलेली आहे. मात्र ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय लातूर’ या नावाचे जुने नामफलक अद्याप बदललेले नाहीत.
लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारण पूर्ण होत नाही. अशा या लोकनेत्याचे नाव लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास देण्याची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आले व जनतेची मागणी लक्षात घेऊन २८ फेब्रुवारी २०२० रोजी ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर’, असे नाव देण्यात आल्याचा अध्यादेश निघाला.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

