मुंबई : आयपीएलमध्ये आज दुसरा सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान आहे. सलामीच्या सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर चेन्नईने सलग दोन विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे सलामीच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर केकेआरच्या संघाला सलग दोन पराभवाचे तोंड पाहावे लागले.
सलामीच्या सामन्यात बलाढ्या सनरायझर्स हैदराबादला पराभुत केल्यानंतर केकेआरने सलग दोन सामने गमावले आहे. त्यांनी पहिले मुंबईकडुन १० धावांनी पराभव स्विकारला. त्यानंतर आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ३८ धावांनी पराभव स्विकारला. या पराभवानंतर केकेआर संघाचा मालक शाहरुख खान चांगलाच नाराज झाला आहे. आजच्या सामन्यात केकेआर समोर चेन्नईचे तगडे आव्हान असणार आहे.
तर मागील आयपीएल स्पर्धेत अपयशी ठरल्यानंतर यंदाची स्पर्धा चेन्नईसाठी महत्वाची आहे. सलामीच्या सामन्यात दिल्लीकडून पराभव स्विकारल्यानंतर सलग दोन सामन्यात विजय संपादन करत चेन्नईने दमदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरली आहे. चेन्नईचे गोलंदाज हे चांगल्याच फॉर्मात आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवुन विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याचा चेन्नई सुपर किंग्सचा इरादा असेल.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; पहिल्या विजयासाठी हैदराबाद उत्सुक
- मोदी सरकार गाफील राहिल्याने कोरोना रुग्णांचे हाल-प्रियंका वाड्रा
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका
- शिवसेना नेत्याचा धक्कादायक दावा : नाशिकच्या ऑक्सिजन गळतीमध्ये ३० ते ३५ रुग्णांचा मृत्यू
- नाशिक ऑक्सिजन गळती : निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? दरेकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

