Share

शिवसेना नेत्याचा धक्कादायक दावा : नाशिकच्या ऑक्सिजन गळतीमध्ये ३० ते ३५ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असल्यानं रुग्णालयातील ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. तर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर या घटनेमुळे ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. यामुळे सर्व ठिकाणाहून ऑक्सिजनची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. ही गळती थांबवण्यासाठी एकच धावपळ पाहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!