नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत असून हा आकडा अधिक वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून येत आहे.
अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हा प्रकार लक्षात येताच स्वतः रुग्णाजवळ धाव घेऊन छातीवर दाब देऊन त्यांना जागवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, रुग्ण सोडत असल्याने नातेवाईक आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यन, आता रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.
निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 21, 2021
भाजप नेते व विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले,’ अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ
- अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाचा जिवलग ‘वीर’ अनंतात कालवश; पोस्ट शेअर करत दिला निरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

