नवी दिल्ली : देशभरात हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरची कमतरता असल्याच्या बातम्या येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येण्याआधी आपल्याकडे मधल्या काळात या सर्वांची उपलब्धता वाढवण्यासाठी वेळ होता. मात्र, केंद्र सरकारने या कडे लक्ष दिले नसल्याने आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये या सर्वांची कमतरता भासत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे. भारत देश हा ऑक्सिजनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. असे असताना भारतामध्येच लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या मागे मोदी सरकारचा कारभार असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. मधल्या काळात आपल्याकडे वेळ होता, तेव्ही ही पूर्व तयारी करायला हवी होती, असेही त्या म्हणाल्या.
आपके पास 8-9 महीने थे, आपके सीरो सर्वे बता रहे थे कि दूसरी लहर आने वाली है, लेकिन आपने उसको इग्नोर किया। आपके पास समय था, व्यवस्थाएं की जा सकती थी: श्रीमती Priyanka Gandhi Vadra #IndiaNeedsOxygen pic.twitter.com/1bhmmdq1e9
— Bihar Congress (@INCBihar) April 21, 2021
ऑक्सिजन पुरवण्याची सुविधा दुसऱ्या टप्प्याच्या आधी तयार करण्यासाठी मोदी सरकारकडे वेळ असूनही याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आज भारतामध्ये ऑक्सिजनची उपलब्धता असून देखील केवळ वाहतूकीची साधणे नसल्यामुळे गरजू लोकांपर्यंत ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचा आरोपही प्रियंका यांनी केला आहे.
महत्त्चाच्या बातम्या
- नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमध्ये ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ


