Share

आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; पहिल्या विजयासाठी हैदराबाद उत्सुक

Published On: 

चेन्नई : यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई येथे आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या संघात पहिली लढत होत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. तर दुसरीकडे सलामीच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर पंजाब संघाला सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सनरायझर्स हैदराबाद हा संघ आयपीएलमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या तिनही सामन्यात हैदराबादच्या संघाचा पराभव झाला आहे. सलामीच्या सामन्यात केकेआरकडून १० धावांनी स्विकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध ६ धावांनी पराभव स्विकारावा लागला. यानंतर मुंबई विरुद्धच्या सामन्यातही १३ धावांनी पराभूत झाले. या तिनही सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची सुरुवात चांगली होऊनही मधली फळी अपयशी ठरल्याने हैदराबादच्या संघाला सलग तीन पराभवाचे तोंड पाहावे लागले.

तर दुसरीकडे पंजाब किंग्स संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला मात्र तो आखेरच्या चेंडुवर त्यामुळे तो विजय मिळवायलाही संघर्ष करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात सीएसकेने पंजाबचा धुव्वा उडवत ६ गडी राखुन दणदणीत पराभव केला. तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने पंजाबने दिलेले १९६ धावांचे लक्ष्य केवळ ४ गडी गमावुन सहज पार केले. आतापर्यंतच्या तिनही सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांची कामगीरी ही सुमार राहिली आहे. फलंदाजीत सलामीवीर सोडले तर मधल्या फळीतील फलंदाज विषेश चमक नाही दाखवू शकले. तर आजच्या सामन्यात हैदराबाद विजयी खाते उघडते का पंजाब पुनरागमन करणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!