Share

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांनी फसला हरताळ

Published On: 

पुणे : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने शासनाची काळजी आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक निर्बंध असताना देखील नागरिक आता नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत असून पर्यटनस्थळे हाउसफुल्ल होऊ लागली आहेत. या गर्दीमुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होईल अशी देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आला आहे. तसंच येत्या आठवड्यातही पुणे आणि पिंपरी चिंडवड मध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र कलम 144 जमावबंदीचा आदेश धुडकावून भुशी डॅमवर पर्यटक दाखल झाले.काल वाढत्या कोरोनोचा अटकाव करण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले होते. त्यामुळे पर्यटन बंदी तसेच जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांनी हरताळ फासल्याचं चित्र आहे.

पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना याठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं, खोल पाण्यात उतरणं व पोहणे यालाही मज्जाव करण्यात आला आहे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अतिउत्साही नागरिक या ठिकाणी जाताना दिसून येत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!